बिनबुडाची मडकी व आयाराम-गयारामांच्या जीवावर पक्षाचे मूळ उद्दिष्ट कधीच साध्य होणार नाही!
सार्वत्रिक निवडणुका आल्या की, विविध पातळीवर पक्षांतर होतात, हे नवीन नाही. पण समविचारी पक्षात पक्षांतर करणे गैर किंवा अनैतिक नाही. पण केवळ व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी विसंगत विचारधारेच्या पक्षात झालेली पक्षांतरे गैर व अनैतिक ठरतात. आपण सामाजिक व राजकीय जीवनात वावरतो, तेव्हा आपली वैचारिक बैठक पक्की असेल तर असे नेते व कार्यकर्ते एकवेळ घरी बसतात, पण विसंगत विचारधारा असलेल्या पक्षात जात नाहीत.......